मराठी माध्यमाच्या शाळा आणि इंग्रजी शब्दांचे उच्चार
आजही ५० वर्षांनंतर शाळेतील इंग्रजी भाषेचा तास आठवतो. शिक्षकांचा तर्खडकर भाषांतरमालेवरचा विश्वास आणि अट्टाहास अजून लक्षात आहे. त्यामुळे व्याकरण निश्चितच पक्के झाले. शब्दोच्चार आणि त्यावरुन केलेली टिंगल आजही सर्वांना लक्षात आहे. काही जण रेन मार्टिन पण वापरायचे.
आज भारतातील बाकी प्रांतात आणि परदेशी लोकांबरोबर काम केल्यावर आपल्या शिक्षकांचा अट्टाहास किती चुकीचा होता ते कळते.
इंग्रजी भाषेतील फ्रेंच शब्दांचे उच्चार आता फ्रेंच नुसार होतात. एन्व्हलप आता ऑन्व्हलप आहे. एंटरप्राइज चे आंतरप्राईझ झाले. रेस्टॉरंट चे रेस्तराँ , हॉटेल चे होटल असे किती तरी शब्द आहेत. फक्त महाराष्ट्रात च्युसडे बाकी जगभर ट्युस्डे, एज्युकेशन चे एड्युकेशन. लेफ्टनंट , कर्नल फक्त भारतात बाकी देशात उच्चार वेगळे होतात.
मीटिंग मध्ये किंवा स्टेजवरून बोलताना आपण कुठल्या शहरात आहोत याचे भान ठेवून उच्चार बदलावे लागतात. श्येडुल चा उच्चार स्केड्युल करावा लागतो. फिक्स्ड चे फिक्सेड करावे लागते.
हेच लोक काय बोलत आहेत हे लक्षात येण्यासाठी ते कुठुन आले हे जाणून घेणे आवश्यक होते. गुजराती प्रोग्राम चा पोग्राम करतात. तामिळनाडू मधे सेस चा चेच होतो. बिहारी स चा श आणि श चा स कधी करतात याचे भान ठेवावे लागते. बंगाली व आणि ब/ भ मधे अदलाबदल करतात.
हे सगळे पाहिल्यावर आपला शाळेतील अनुभव काय कामाचा असा प्रश्न पडतो
Comments
Post a Comment